राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ही टीका केली की त्यांना शिरुरमध्ये उमेदवारही मिळत नाही. याबाबत रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्यांनी अमोल कोल्हेंना बेडकाची उपमा दिली आहे. रुपाली चाकणकर असंही म्हणाल्या आहेत की आधी अमोल कोल्हेंनी स्वतःच्या घरासमोरचा रस्ता नीट करावा.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

“बेडकाने छाती फुगवली त्याला वाटतं आपण बैल झालो असं वाटतं. उमेदवार वगैरे मिळत नाहीत अशी हास्यास्पद विधानं त्यांनी करु नयेत. कारण इतके दिवस मतदारसंघात न फिरकलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकाच्या निमित्ताने लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना पाच वर्षात करता आला नाही. तरीही आपण मतदारसंघात आहोत असं सांगत आहेत. इतका आत्मविश्वास येतो कुठून हा प्रश्न आहेच.”

black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
genelia and riteish deshmukh invited suraj chavan to their home
रितेश भाऊ अन् जिनिलीया वहिनींकडून खास निमंत्रण! सूरज चव्हाण देशमुखांच्या घरी केव्हा जाणार? म्हणाला, “ते देवमाणूस…”

सुनेत्रा वहिनी चांगल्या मतांनी निवडून येतील

” सुनेत्रावहिनी या विकासाच्या जोरावर सगळ्या उमेदवारांमध्ये निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. संधी मिळाली आहे त्यांना ही चांगलीच गोष्टच आहे. एकाच व्यक्तीला पंधरा वर्षे संधी मिळाली आता आदरणी सुनेत्रा वहिनीही चांगल्या मताधिक्याने निवडून येतील” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार हे लवकरच लोकसभेचे उमेदवार जाहीर करतील. प्रत्येक जागेवर अजित पवार उभे आहेत असं समजूनच मतदान होईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आम्ही महिला भगिनींनी अजित पवारांचे आभार मानले कारण त्यांनी विकासाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सादर केला. तसंच महिला घटकांचा चांगला विचार केला आहे. आशा वर्कर यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसंच त्यांना न्याय देण्याची भूमिकाही आपण घेतली आहे असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.