संजय काकडे यांनी अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं. अजित पवार हे शांत बसणारे नेते नाहीत ते कदाचित स्वतंत्र पक्ष काढू शकतात असं संजय काकडे यांनी म्हटलं होतं. ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ” संजय काकडे यांनी आपलं भविष्याचं दुकान बंद करावं” असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे. संजय काकडे यांच्या वक्तव्याविरोधात रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संजय काकडे तुमचं भविष्यवाणीचं दुकान बंद करा. खरं तर तुम्हा लोकांना, इतका मोठा परिवार आहे एकत्र राहतो आणि एक विचाराने राहतो याचे जास्त दुःख जास्त आहे. पुण्यातील पूरस्थितीत दिसले नाहीत कुठे, तिकडेही पण बघा जरा” असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी संजय काकडेंना सुनावलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या राजीनाम्याचं कारण सांगितलं. मात्र काल त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर ते नॉट रिचेबलही होते. त्यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये विविध तर्क लढवले जात होते. तर संजय काकडे यांनी अजित पवार हे कदाचित दुसरा पक्ष काढू शकतात असं म्हटलं होतं. संजय काकडे यांच्या याच वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांनी समाचार घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar reaction on sanjay kakade statement on ajit pawar scj