सांगली : करजगी (ता. जत) येथील बालिकेवर अत्याचार करून खून करणार्या संशयिताविरूध्द अल्प वेळेत म्हणजे १५ दिवसात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शनिवारी सांगितले.
करजगी येथे पिडीत कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी उप अधिक्षक सुनील साळुंखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, महिला व बालविकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती चाकणकर म्हणाल्या, आरोपीविरूध्दचा खटला जलदगती न्यायालयात चालावा आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील पिडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देउ.घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.