अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र अद्यापही त्यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. याच कारणामळे आपल्या नोकरीचा राजीनामा न देताच त्या निवडणूक लढवत आहेत, असा आरोप केला जातोय. तर सर्व सोपस्कार पूर्ण करूनही प्रशासन राजीनामा मंजूर कर नाहीये, असा आरोप उद्धव ठाकरे गट तसेच ऋतुजा लटके यांच्याकडून केला जात आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर ऋतुजा लटके यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी प्रशासनास राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >>>> समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? भास्कर जाधव म्हणाले “हे चिन्ह आम्ही…”

Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Image of Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Markadwadi : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट, शरद पवार यांच्या आमदाराने सांगितली तारीख
Pratap Sarangi and Mukesh Rajput
BJP MP Pratap Sarangi : राहुल गांधींनी ‘धक्का’ दिल्याचा आरोप करणारे प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत कोण आहेत? जाणून घ्या!
Ravindra Waikar MP , Amol Kirtikar Petition,
रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार, अमोल कीर्तीकरांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
kisan kathore meet nitin Gadkari
उलटा चष्मा : दु:खनिवारणाचे गुपित
Eknath Shinde
Prakash Surve : “मी नाराज नाही, पण दुःखी”, मंत्रिमंडळात न घेतल्याने शिंदेसेनेच्या आमदाराने व्यक्त केली खदखद

उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने अद्याप स्वीकारलेला नाही. त्यांनी राजीनामा, एका महिन्याचे वेतन पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने हा राजीनामा मंजूर केलेला नाही. दुसरीकडे नियमानुसार शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. याच कारणामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असताना आता ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (१३ सप्टेंबर) तातडीची सुनावणी होणार आहे. तशी माहिती विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>>प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “निखाऱ्यावरून चालताना…”

ऋतुजा लटके यांच्या मार्फत उद्धव ठाकरे गटातील नेते विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. ऋतुजा लटके यांनी पालिकेच्या कर्मचारीपदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच त्यांनी एका महिन्याचे वेतनही पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. असे असूनही प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर का केला जात नाही, असे विचारल्यानंतर प्रशासन उत्तर देत नाहीये. प्रशासनावर कोणाचातरी दबाव आहे. प्रशासनावर असा दाबाव टाकला जात असेल, तर देशातील लोकशाही कशी टिकणार? असा सवाल विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. प्रशासन जाणीवपूर्वक ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करत नाही, असा आमचा ठाम आरोप आहे. प्रशासनावर हा दबाव कोण टाकत आहे, हे महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे, असा आरोपही महाडेश्वर यांनी केला.

Story img Loader