Maharashtra Breaking News Updates, 05 August 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर त्यांच्यातडून उघड उघड घेतली जाते. तर, दुसरीकडे राज्यातील विविध भागात तुफान पाऊस कोसळतोय, पण मुंंबई मात्र कोरडी राहिली आहे. पुण्यात हाय अलर्ट जारी केला असून सराकरकडून पुण्यावर लक्ष ठेवलं जातंय. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 05 August 2024 :  महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

14:17 (IST) 5 Aug 2024
कल्याणमध्ये नोकरदार तरूणीचा विनयभंग

कल्याण – मागील महिनाभर कल्याण मधील एका २४ वर्षीय नोकरदार तरूणीचा पाठलाग करून, तू माझ्यावर प्रेम कर. तू माझ्यावरील प्रेमाला नकार दिला तर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या, तसेच या तरूणीचा विनयभंग करणाऱ्या मोहसिन शेख (२४) या तरूणाविरूध्द पीडित तरूणीच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 5 Aug 2024
मुसळधार पावसात कल्याणमधील आधारवाडी, गांधारे रोड परिसरात तीव्र पाणी टंचाई; महागड्या टँकरच्या पाण्यावर रहिवासी अवलंबून

कल्याण – मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण पश्चिमेतील नवीन कल्याण म्हणून विकसित झालेल्या आधारवाडी, गांधारे रोड, वसंती व्हॅली परिसरात गेल्या दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी हैराण आहेत. पालिकेचे आणि चढ्या दरातील खासगी टँकरचे पाणी विकत घेऊन रहिवाशांना पाण्याची गरज भागवावी लागत आहे.

सविस्तर वाचा

12:53 (IST) 5 Aug 2024
“…तर येणाऱ्या संकटाला चंद्रकांत पाटील जबाबदार असतील, कारण ते प्रत्येकवेळी”, यशोमती ठाकूर अमरावतीत गरजल्या…

अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नेहमीच दुजाभाव केला जात असल्‍याचा आरोप काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, आमच्या मतदारसंघातही लोक राहतात त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी आवश्यक असताना तो दिला जात नाही, पहिल्यांदाच पालकमंत्र्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता निधी द्यायचे कबूल केले आहे, हा निधी तरी मिळावा अशी अपेक्षा आहे.

सविस्तर वाचा

12:36 (IST) 5 Aug 2024
प्रकाश आंबेडकर थेटच बोलले….“शिवसैनिकांच्‍या दृष्‍टीने एकनाथ शिंदेंचा पक्षच खरी शिवसेना…”

अमरावती : लोकसभा निवडणुकीतील कामगिरीकडे पा‍हता मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘स्‍ट्राईक रेट’ हा माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यापेक्षा दुप्‍पट असून शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्‍या पक्षालाच खरी शिवसेना मानू लागले आहेत, असे स्‍पष्‍ट मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्‍यक्‍त केले आहे.

सविस्तर वाचा

12:18 (IST) 5 Aug 2024
ताडोबाची वाघिण इटलीत…फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहोळ्यात…

नागपूर: जगभरातील पर्यटकांना आकर्षित करुन घेण्याची क्षमता आहे ती ताडोबातील वाघांमध्येच. जागतिक पर्यटन नकाशावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे नाव अग्रक्रमावर आहे. अर्थातच त्यात ताडोबातील वाघांचे योगदान आहे. अलीकडेच याच ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील ‘नयनतारा’ या वाघिणीने थेट इटलीत धडक मारली.

सविस्तर वाचा

11:51 (IST) 5 Aug 2024
मुंबई-गोवा महामार्गावरून रवींद्र चव्हाण- श्रीकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जुंपली; विधानसभेपूर्वी चव्हाण यांना घेरण्याची शिवसेनेची रणनिती

डोंबिवली कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते कामांसह इतर कामांचा रतीब पाडणारे आणि इन्फ्रामॅन म्हणून स्वताची ओळख निर्माण करणाऱ्या खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील २० वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात लक्ष घालावे. कोकणात गणेशोत्सव काळात वर्षानुवर्ष जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गातील खड्ड्यांचे विघ्न कायमचे दूर करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह कोकणातीह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा

11:13 (IST) 5 Aug 2024
नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

नाशिक – रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी लक्षणीय कमी झाली.

सविस्तर वाचा

10:49 (IST) 5 Aug 2024
“भाजपाला पाठिंबा दिला तो केवळ लोकसभेसाठी, विधानसभेचं…”; युतीबाबत विचारताच राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज ठाकरे यांना लोकसभेनंतर आता विधानसभेतही भाजपाबरोबर युती होणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला, यासंदर्भात बोलताना, मी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मी स्पष्ट सांगिलतं होतं, की मी हा पाठिंबा केवळ नरेंद्र मोदी यांना देतो आहे. तेव्हा मी विधानसभेच्या पाठिंब्याचं कुठंही बोललो नव्हतो. त्यामुळे आता युतीचा विषय नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

10:29 (IST) 5 Aug 2024
मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी

नाशिक : मनोज जरांगे यांचा सात ऑगस्टपासून राज्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी भागात होणाऱ्या दौऱ्याचा समारोप १३ तारखेला नाशिकमध्ये शांतता फेरीने होणार आहे.

वाचा सविस्तर…

10:28 (IST) 5 Aug 2024
बिटकॉइनच्या नादात व्यावसायिक महिलेने गमावले लाखो रुपये

मुंबई : बिटकॉइनमध्ये (कूट चलन) गुंतवणूक व्यावसायिक महिलेला भलतीच महागात पडली. बिटकॉइन खरेदी करण्याच्या नादात महिलेने सव्वा लाख रुपये गमावले आहेत. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

10:27 (IST) 5 Aug 2024
पावसामुळे पुण्यात शहरभर खड्डे; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘या’ ३० चौकांत जड वाहनांना बंदी

पुणे : पावसामुळे शहरातील बहुतांश प्रमुख चौकांत खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून, कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख ३० चौक सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना बंद करण्यात येणार आहेत. १२ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

सविस्तर वाचा…

10:16 (IST) 5 Aug 2024
“महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये”, राज ठाकरेंची टीका

शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही – राज ठाकरे</p>