Maharashtra Breaking News Updates, 05 August 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर त्यांच्यातडून उघड उघड घेतली जाते. तर, दुसरीकडे राज्यातील विविध भागात तुफान पाऊस कोसळतोय, पण मुंंबई मात्र कोरडी राहिली आहे. पुण्यात हाय अलर्ट जारी केला असून सराकरकडून पुण्यावर लक्ष ठेवलं जातंय. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Today, 05 August 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधा योजनेंतर्गत १.७ कोटी लाभार्थ्यांना प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेलाचे वाटप करण्यात येणार आहे.
मुंबईत म्हाडाचे घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून २०३० घरांच्या सोडतीची जाहिरात ८ ऑगस्टला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
नाशिक – शहर पोलिसांच्या वतीने शनिवार आणि रविवारी शहर आयुक्तालय हद्दीत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत १८ मद्यपींवर कारवाई करण्यात आली असून एक लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
करणने दरवाजा उघडला असता ती व्यक्ती घरात शिरली व त्याने आपण गुन्हे अन्वेषण विभागातून (सीआयडी) आल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने घरातील सर्व दिवे लावण्यास सांगितले.
नाशिक – बम बम भोले…ओम नमो शिवाय, अशा जयघोषात श्रावणातील पहिल्या सोमवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व शिवमंदिरे भक्तांनी गजबजली. पावसाने विश्रांती घेतल्याने भाविकांचा उत्साह अधिकच वाढला. सर्वच मंदिरांना रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वरसह कपालेश्वर, सोमेश्वर, दोधेश्वर या मंदिरांमध्ये सायंकाळपर्यंत भाविकांची गर्दी कायम होती.
‘युवा महोत्सवासारख्या स्तुत्य उपक्रमातून अनेक प्रतिभावंताना त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा अविष्कार सादर करण्याची मोठी संधी मिळते’, असे मत शिवाजी साटम यांनी व्यक्त केले.
पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण हे (कट ऑफ) नव्वदीच्या उंबरठ्यावरच राहिले होते.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ७ हजार २७३ उमेदवार पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्यांची टक्केवारी ६.६६ आहे.
धाराशिव शहरातील पुष्पक हॉटेल येथे राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरूणांची गर्दी झाली होती.
विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने नेतेमंडळींचे दौरे व मतदारांशी संपर्क अभियान सुरू झाले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसंकल्प मेळाव्यांच्या माध्यमातून पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
मालेगाव : मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रामपुरा शिवारात रविवारी मध्यरात्री एका पोल्ट्री शेडमध्ये घुसलेल्या बिबट्याने धुमाकूळ घालत कोंबड्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात जवळपास ४० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.
हिना शेख यांच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीची परवानगी न घेता नवा घरोबा करणार्या शिक्षक फेरोज शेख यांना नोटीस बजावण्यात आली.
निवडणूक ही निवडणूक आहे. कोणताही पक्ष उमेदवार देणार. आम्ही लढत राहणार. शिवसेना पूर्ण ताकदीने उतरून विजयी होणार. महाविकास आघाडी लढतेय, त्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवडी विधानसभेवर भगवा फडकवू. पक्ष ठरवेल तो उमेदवार असेल. आमच्याकडे आदेश असतो, उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. – अजय चौधरी, आमदार, शिवडी विधानसभा मतदारसंघ
वर्धा : दोन दिवसातील काही अपघातानंतर आता एक मोठा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. नागपूर ते मुंबई महामार्गावर एका अज्ञात ट्रकची रिक्षास धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच रिक्षात बसलेले अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर : शहरात नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास एनआयटी आणि नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण एनएमआरडीए यांच्या अख्यारितील पाच हजारांवर अवैध बांधकामांना चिन्हित करण्यात आले आहे. यापैकी निम्म्या अवैध बांधकामांना पाडल्याची माहिती संयुक्त निरीक्षण समितीच्यावतीने उच्च न्यायालयात सादर करण्यात आली.
नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्कात मोठ्या कपातीच्या घोषणेनंतर नागपूरसह देशभरात सातत्याने सोने- चांदीचे दर घसरत होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याने प्रति दहा ग्राम ७० हजारांवर गेले होते. सोमवारी (५ ऑगस्ट) नागपुरात सोन्याच्या दरात प्रत्येक दीड ते दोन तासात चढ- उतार बघायला मिळत आहे. परंतु दर कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे.
Eknath Shinde: सिंहगड रोड परिसरातील नदी काठच्या भागातील सोसायटींमधील घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहे.
मालेगाव : येथील गिरणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या १५ जणांची तब्बल १९ तासानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. मोठ्या प्रतिक्षेनंतर या सर्वांची सुटका करण्यात यश आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, “प्रत्येकाचं आपआपलं मत आहे. व्यक्त करायला हरकत नाही.”
राज ठाकरेंना चर्चेत राहायला आवडतं. आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचा रेलेव्हन्स संपलेला आहे. शरद पवारांनी काय करावं, यापेक्षा राज ठाकरेंनी काय करावं, किती वेळा भूमिका बदलाव्यात याचा त्यांनी विचार करावा. शरद पवारांना उपदेश करायला जाऊ नका – जितेंद्र आव्हाड</p>

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ ते ७ सप्टेंबर दरम्यान ४,३०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील दोन ठगांनी चक्क आंतराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नाव वापरून एका शेतकऱ्याची १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. अनिल बन्सीलाल राठोड (रा. चांदूर रेल्वे) आणि संदीप दादाराव राठोड (रा. पोहरा बंदी) अशी आरोपींची नावे आहेत.
पावसाळी अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्याचा न्याय व विधि विभागाचा प्रयत्न होता.
नागपूर: पोलिसांनी एखाद्या आरोपीला सूचनापत्र देऊन सोडले तर नंतर त्याला कारागृहात स्थानबद्ध करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एमपी़डीए कायद्याच्या अंतर्गत अशाप्रकारे स्थानबद्धतेचे आदेश काढणे बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत उच्च न्यायालयाने आरोपीच्या स्थानबद्धतेचा आदेश रद्द केला.
मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेतृत्व करणाऱ्या अलिबागच्या (रायगड) पाटील कुटुंबातही राजकीय कलह निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात ‘शेकाप’चे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात पाटील कुटुंबियांतील दोघा माजी आमदार बंधूंमध्ये जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर जोरदार बाचाबाची झाली.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत ‘मला नकली म्हणणारे बेअकली’ अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला फारसे महत्व न देता भाजपच्या प्रमुख नेत्यांवर जहरी टीका करण्याची रणनिती आखली आहे. त्याची चुणूक मुंबई व पुण्यातील दोन सभेत दिसून आली.
नवी मुंबई : महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात गेल्याने एक पाऊल मागे जावे लागलेल्या नवी मुंबईतील गणेश नाईक कुटुंबियांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आत्तापासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.