आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर पक्षांतर्गतही बैठका, कोअर कमिटीच्या बैठका सुरू आहे. अनेक ठिकाणी मतदारसंघनिहाय बैठका आणि चर्चा होत आहेत.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील शिरूर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडे आहे. अमोल कोल्हे हे शिरूरचे खासदार आहेत. परंतु, शिवसेनेचा ठाकरे गट या मतदारसंघासाठी अग्रही असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचित केली. यावेळी सचिन अहिर यांनी सांगितलं की शिरूरबाबत आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…

शिरूर मतदारसंघासाठी शिवसेनेचा ठाकरे गट अग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्याबद्दल काय सांगाल असा प्रश्न विचारल्यावर सचिन अहिर म्हणाले, कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. शिरूरमध्ये आम्ही याआधी लढलो होतो. लोकसभेत विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आहेत. ते (अमोल कोल्हे) सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. परंतु तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत.

आमदार सचिन अहिर म्हणाले, पुण्यातील कसबा मतदारसंघात आम्ही काँग्रेसला मदत केली होती. मग यावेळी त्यांनी आमच्याबाबत विचार का करू नये? बाजूचा मतदारसंघ मावळमध्ये आमचा निवडून आलेला खासदार आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही काही मागणी करण्यासाठी बैठक (ठाकरे गटाची बैठक) नाही. ही संघटनात्मक बैठक आहे. जिथे आपल्याकडे जिल्हा परिषदेचे चार सदस्यसुद्धा नाहीत तिथे लोकसभेच्या जागेची मागणी करायची हे योग्य नाही. तसं होता कामा नये.

हे ही वाचा >> “…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले”; राज ठाकरेंचा टोला, म्हणाले, “पंतप्रधानांनी…”

ठाकरे गटाचे आमदार अहिर म्हणाले, शिरूरबद्दल आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यांचा आग्रह आहे. मावळमध्ये तर आमचाच खासदार आहे. त्यासंदर्भात आगामी निवडणुकीत कोण उमेदवार असू शकतो, कोण नसू शकतो, याविषयी सध्या आम्ही चर्चा करत आहोत.

Story img Loader