केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आव्हान गांभीर्याने घेत मध्य प्रदेशातील उज्जैन येथील भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी काही महिन्यातच तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. अनिल फिरोजिया यांचे वजन पूर्वी १३२ किलोच्या आसपास होते. मात्र, आता ते फिट इंडिया चळवळीत सामील होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. नियमित दिनचर्येच्या मदतीने त्यांनी त्यांचे वजन ९३ किलोपर्यंत कमी केले आहे.
हेही वाचा : “एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख…; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर पलटवार!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जूनमध्ये अनिल फिरोजिया यांना, वजन कमी केल्यास प्रति एक किलो एक हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. खासदार अनिल फिरोजिया यांनी ते आश्वासन आव्हान म्हणून स्वीकारले आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत ३२ किलो वजन कमी केले आहे. त्याचवेळी दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुमारे २३०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत अनिल फिरोजिया यांना खास भेट दिली आहे. यावरून काँग्रेसनेते सचिन सावंत यांनी टिप्पणी केली आहे.
PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस
“हे भारी आहे! विभागाचा विकास करण्यासाठी अधिकाधिक निधी मिळवायचे असेल तर भाजपाचे खासदार कायम स्वरुपी उपोषण करतील याकडे जनतेने लक्ष ठेवावे. वजन वाढू देऊ नये. जितके सुकतील तितका जास्त विकासनिधी!महाराष्ट्रात भाजपाचे अनेक खासदार वजनदार असल्याने त्यांच्या मतदारसंघातील विकास खुंटला आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
तर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप खासदार फिरोजिया म्हणाले की, “मी गडकरी यांचे बोलणे आव्हान म्हणून स्वीकारले आणि ३२ किलो कमी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला सांगितले की, वजन कमी केल्यास उज्जैनच्या विकासकामांसाठी प्रति किलो १ हजार कोटी मिळतील. खासदार अनिल फिरोजिया यांनी ते आश्वासन आव्हान म्हणून स्वीकारले आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत ३२ किलो वजन कमी केले आहे.”
नितीन गडकरी म्हणाले होते, “अनिल फिरोजिया यांना मी एक अट घातली आहे. माझं वजन त्यांच्यापेक्षा अधिक होतं. माझं वजन १३५ किलोग्रॅम होतं. आता माझं वजन ९३ किलो आहे.” “त्यामुळे अनिल फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघासाठी देईन. अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्यासाठी मी १ किलोग्रॅममागे १ हजार कोटी रुपये देईन.”