राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेनेसह काँग्रेस पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपालांना हटण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “गुजराती, राजस्थानी हा विषय राहू द्या, सर्वात आधी यांनाच नारळ दिला पाहिजे”, असा टोला सावंतांनी राज्यपालांना लगावला आहे.

हेही वाचा- “हे पार्सल परत पाठवायला हवं”; वादग्रस्त व्यक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका

“राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती, राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच. पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला” असल्याचे सावंत म्हणाले.

हेही वाचा- चंद्रपूर : तर शिवरायांचे मावळे राज्यपालांना सळो की पळो करून सोडतील! ; खासदार बाळू धानोरकर यांचा सज्जड इशारा

मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट

मुंबई मराठी माणसाच्या मेहनतीवरच आर्थिक राजधानी झाली आहे. ते कुणालाही नाकारता येणार नाही. राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीनं जबाबदारीनं बोलायला हवं. त्यांनी कुणाचाही अवमान होईल असं बोलता कामा नये. आम्ही त्यांच्याशी सहमत नाही. आम्हाला हे मान्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तर कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader