Sada Sarvankar Mahim Vidhansabha Constituation : माहिम विधानसभा मतदारसंघातून यंदा तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे अन् शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, लोकसभेला राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्यातील काही मतदारसंघात भाजपा आणि मनसेत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे माहिममधून सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा पहिल्यांदाच अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली असून माहिममधून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली जातेय. परिणामी सदा सरणवकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढला होता. येत्या २४ तासांत त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं म्हटलं गेलं होतं. परंतु, त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवरून उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरायला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

eknath shinde, rebellion, colleagues, nashik district, dada bhuse, suhas kande, shiv sena
बंडात साथ देणाऱ्यांना संधी; शिवसेनेची दादा भुसे, सुहास कांदे यांना उमेदवारी
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
MP Amar Kale is trying for his wife Mayura Kales candidacy
पत्नीच्या तिकिटासाठी खासदार प्रयत्नशील, मात्र काँग्रेस नेत्यांचा विरोध
Ajit Pawar Vs Sharad Pawar Rajendra Shingne Join NCP
Rajendra Shingne : अजित पवारांना ऐन निवडणुकीत आणखी एक मोठा धक्का; ‘या’ आमदाराचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Badlapur sexual assault case, Agitator lady, Sangita Chendvankar, MNS candidat
बदलापूर प्रकरणातील ‘ती’ रणरागिणी विधानसभेच्या रिंगणात
all schemes including ladki bahin yojana will continue if mahayuti comes in power
‘लाडकी बहीण’सह सर्व योजना सत्ता आल्यास सुरू राहणार; देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची ग्वाही
Special training for police officers in the state for elections nashik news
निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
Raj Thackeray appeal, Raj Thackeray,
जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आव्हान

“निवडणुकीच्या साहित्य पक्षाकडून आलेला आहे. एबी फॉर्म आलेला आहे. त्यामुळे या चर्चा माध्यमांमध्येच आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दबाव माझ्यावर कोणीही केलेला नाही. उद्या सकाळी १० वाजता मी उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं सदा सरवणकर टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत म्हणाले.

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : लाडक्या बहिणींच्या साक्षीने अजित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज!

मनसेला पाठिंबा देण्यावरून सदा सरवणकर काय म्हणाले?

“राज ठाकरेंवरील प्रेमापोटी आशीष शेलार मनसेला पाठिंबा द्या म्हणत असतील. दीपक केसरकरही असं म्हणत असती तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून मनसेला पाठिंबा द्यावा. आम्ही या मतदारसंघात ३० वर्षांपासून काम करतोय”, असं सदा सरवणकर म्हणाले. मुंबईतील असा कोणताही प्रश्न नसेल ज्याला आम्ही स्पर्श केला नसेल. त्यामुळे मतदारांच्या पूर्ण लक्षात आहे की आपलं काम कोण करणार आहे, हा विश्वास आहे”, असं सदा सरवणकर म्हणाले.

उद्या अर्ज का भरणार?

“दोन्ही पक्ष आजच अर्ज भरणार आहेत. कुठे वाद वगैरे होऊ नये म्हणून उद्या भरणार आहे. तसंच, मुख्यमंत्री आज अर्ज भरत आहेत, त्यामुळे आमचे शिवसैनिक तिथे गेले आहेत. त्यामुळे मी उद्या अर्ज भरणार आहे”, असं स्पष्टीकरण सदा सरवणकर यांनी दिलं.