दूध उत्पादक शेतकऱयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना बुधवारी अटक करण्यात आली. बुधवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास सदाभाऊ खोत स्वतःहून पोलीसांपुढे हजर झाले. त्यानंतर अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सदाभाऊ खोत हे २००९-१० मध्ये देवकीनंदन दूध डेअरीचे अध्यक्ष होते. त्यावेळी कर्जाच्या माध्यमातून शेतकऱयांना गाई-म्हशी देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले होते. यासाठी शेतकऱयांच्या नावावर प्रत्येकी ३१ ते ३५ हजार रुपयांची कर्ज प्रकरणेही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱयांना जनावरे मिळालीच नाहीत.
यानंतर साक्री तालुक्यातील बळसाने येथील राजधर पाटील यांनी जून २०१३ रोजी सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्यासह स्टेट बॅंकेच्या स्थानिक शाखेचे तत्कालिन प्रमुख सुभाषचंद्र विवरीकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विवरीकर यांना अटक करण्यात आली आणि त्यांना जामीनही मिळाला. सदाभाऊ खोत यांनीही धुळे सत्र न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी पोलीसांपुढे शरणागती पत्करली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा