एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तोच अजित पवारांनी ८ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच, शरद पवारांनी ४० वर्षापूर्वी केलेल्या बंडाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

सदाभाऊ खोत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात माजी मुख्ममंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. ट्विटवर लिहिलं की, “दादा तुम्ही आज पाहिजेत होता.”

Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

तर फोटोवर लिहण्यात आलं आहे की, “स्व. लोकनेते वसंतदादा पाटील, तुम्ही आज असायला पाहिजे होता. देवेंद्रजींनी तुमच्या अपमानाची व्याजासह परतफेड केली आहे.”

हेही वाचा :

१९७८ साली काय घडलं होतं?

आणीबाणीनंतर महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९७८ साली सरकार स्थापन करण्यात आलं. रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. तर, इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले होते. सरकार स्थापनेनंतर या दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु झाली.

अशातच १९७८ साली ऐन पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षात असलेले शरद पवार ४० आमदारांसह विरोधी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे वसंतदादा पाटील यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

हेही वाचा :

दरम्यान, अलीकडेच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केल्याची आठवण सांगितलं होती. “शरद पवारांची ती मुत्सद्देगिरी असेल, तर एकनाथ शिंदे यांच्या बंडाला गद्दारी कसे काय म्हणता येईल,” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

Story img Loader