Sadabhau Khot on Rahul Gandhi at Markadwadi BJP Public Meeting : महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव विरोधकांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान बनलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने याच मारकडवाडीत ईव्हीएमच्या समर्थनात मोठी सभा आयोजित केली आहे. नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, रयंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत मारकडवाडीत ही सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना सदाभाऊ खोत यांनी काँग्रेसचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी मारकडवाडीला जाणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. त्यामुळे खोत यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील मारकडवाडीला गेले होते. मारकडवाडीतील ग्रामस्थांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं पवारांनी जाहीर केलं. त्यामुळे खोतांनी शरद पवारांवरही टीका केली.

सदाभाऊ खोत म्हणाले, “इंडियातला सर्वात मोठा चोर मारकडवाडीत येणार आहे. राहुलबाबा मारकडवाडीत येणार असल्याचं मी ऐकलं. परंतु, माझं गावकऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही इथे एक फलक लावून ठेवा. त्यांना विचारा, काट्याकुट्यातून तुडवित रस्ता… कसा गावकडं आलास बाबा…? राहुल बाबा अमेरिकेला जातात, जपान-रशियाला जातात. परंतु, त्यांना माहिती नाही की या इंडियात एक भारत देश सुद्धा आहे. या भारतात दगडमातीची घरं आहेत. आम्ही तुमचं या गावात स्वागत करू. हवं तर आमचा हा मंडप (भाजपाचा सभेचा मंडप) असाच तुमच्यासाठी ठेवू. तुम्ही मागितलात तर भटजीसुद्धा ठेवू. कारण गावाकडील मंगलाष्टका जरा ऐका. कारण राहुल बाबाचं एकच स्वप्न आहे. मेरी शादी कब होगी? जब मैं पंतप्रधान बनूंगा तब मेरी शादी होगी (माझं लग्न कधी होणार? मी पंतप्रधान झाल्यावर माझं लग्न होणार).

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!

राहुल गांधींचा मारकडवाडीत शपथविधी करू : सदाभाऊ खोत

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, “राहुल गांधींना मतपत्रिकेवर मतदान घ्यायचं आहे. बिचाऱ्याचं लग्न झालं पाहिजे बाबा. पोलिसांना मी विनंती करतो की त्यांना दोन डबे मांडून द्या. तिथे मतपत्रिकेवर मतदान होऊ द्या. तो निवडून आला की त्याचा इथेच पंतप्रधानपदाचा शपथविधी घेऊ. त्याची इच्छा पूर्ण होऊ दे आणि इथेच त्याच्या डोक्यावर अक्षता पडू देत.

हे ही वाचा >> Maharashtra News Live : ईव्हीएमच्या समर्थनात भाजपा मैदानात, खोत-प

सदाभाऊंची शरद पवारांवर टीका

सदाभाऊ खोतांनी यावेळी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवरही टीका केली. ते म्हणाले, मारकडवाडी गाव भाग्यवान आहे. खळं लुटणारा या गावात आला आहे. दिवसाढवळ्या आमचं खळं कोण लुटतंय असा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला. पण मारकडवाडीचे ग्रामस्थ लय बहाद्दर आहेत. त्यांनी भुलवत भुलवत खळं लुटणाऱ्याला गावात आणलंय.

Story img Loader