साहित्य अकादमीने गुरुवारी वार्षिक युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. मराठी भाषा विभागात राहुल कोसंबी यांची युवा पुरस्कार तर बाल साहित्यासाठी ल.म. कडू यांची निवड करण्यात आली आहे. कोकणी भाषेत अमेय नायक यांना युवा पुरस्कार मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य अकादमीची गुरुवारी बैठक झाली. अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली गुवाहाटीमध्ये अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पुरस्कारप्राप्त लेखकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. २४ भाषांमधील लेखकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मराठी भाषेत राहुल कोसंबी यांना ‘उभं-आडवं’ या कथासंग्रहासाठी अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर कोकणी भाषेत ‘मोग डॉट कॉम’ या कवितासंग्रहासाठी अमेय विश्राम नायक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हिंदीमध्ये तारो सिदिक आणि उर्दूमध्ये रशीद अशरफ खान यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बहुमताच्या आधारे या साहित्यिकांची निवड करण्यात आल्याचे अकादमीने म्हटले आहे. ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या साहित्यिकांची साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारासाठी निवड केली जाते. ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

युवा पुरस्कारांसह साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणाही केली आहे. ५० हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारांमध्ये मराठीत ल. म. कडू यांना ‘खारीच्या वाटा’ या पुस्तकासाठी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. कोकणी भाषेत विन्सी क्वाद्रूस यांची जादूचे पेटूल या पुस्तकासाठी निवड करण्यात आली.