सांगली : सागरेश्वर आणि राधानगरी अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २२ व २३ मे रोजी बौध्द पौर्णिमेदिवशी प्राणीगणना करण्यात येणार आहे. या प्राणी गणनेमध्ये सहभागी होउ इच्छिणार्या व्यक्तींनी संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
चांदोलीसह राधानगरी व सागरेश्वर या अभयारण्यात बौध्द पौर्णिमेवेळी पाणवठ्यावर प्राणीगणना करण्यात येणार आहे. यासाठी संरक्षित क्षेत्रामध्ये ६० हून अधिक ठिकाणी मचाण बांधण्यात येत आहेत. यानिमित्ताने अभ्यासकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहून अरण्यवाचनाचा अनुभव घेता येणार आहे.
हेही वाचा…“आज माझा दादा असता तर…”, खडसेंच्या घरवापसीवर मुलगी रोहणी खडसेंची प्रतिक्रिया
प्राणीगणनेसाठी २२ मे रोजी दुपारी तीन वाजल्यापासून २४ मे रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत पाणवठ्यावर येणार्या प्राण्यांचे निरीक्षण करणे, त्याची नोंद करणे, हालचाली टिपणे या बाबी अभ्यासकांना करता येणार आहेत.