उत्तर महाराष्ट्रस्तरिय जलतरण स्पर्धेत भोसला साई सेंटरच्या आठ जलतरणपटूंनी विविध वयोगटात वैयक्तिक अजिंक्यपद मिळविले. साई सेंटरच्या कृष्णा गडाख, सिद्धी कोतवाल, तन्मय पाटील, श्वेता शार्दुल, अभिषेक कित्तुर, रुई सुखटणकर, प्रसाद खैरनार, नमिता मादगुंडी यांनी तर निवेक क्लबच्या सोहम खाडिलकर, सारा शेख, गितांजली वागसकर आणि नाशिक स्विमिंग क्लबच्या रिचा सुखटणकर यांनी वेगवेगळ्या वयोगटात अजिंक्यपद मिळविले. मध्यवर्ती हिंदू सैनिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नाशिक येथे ही स्पर्धा झाली. उत्तर महाराष्ट्रातील पहिला जलतरण तलाव म्हणून ओळख असलेल्या भोसला सैनिकी शाळेच्या तलावावर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेसाठी उत्तर महाराष्ट्रातून सुमारे २०० जलतरणपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धा ६, ८, १०, १२, १४, १६, १९ आणि खुला या आठ वयोगटात फ्री स्टाइल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, वैयक्तिक मिडले या प्रकारात झाली. स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती सुधीर मुतालिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह प्रा. सुहास देशमुख, कार्याध्यक्ष व्ही. एच. पाटील, भोसला विद्यालयाचे अध्यक्ष आशुतोष रहाळकर आदी उपस्थित होते. प्रास्तविक सहकार्यवाह डी. के. कुलकर्णी यांनी केले.
यावेळी मुतालिक यांनी मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कौशल कारखानीस याने खेळाडू व पालकांनी यशाची चिंता न करता संयम बाळगून कठोर परिश्रम घेतले तर निश्चितच यश मिळेल, असे सांगितले. सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा