राहाता : साई भक्तांचे चारचाकी वाहन अज्ञात ७ ते ८ तरुणांनी अडवून बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या, चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. ही लूटमार केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत

गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी असलेले मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत इर्टिगा या चारचाकी वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते. त्यांचे वाहन लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता दुसऱ्या एका आर्टिगा चार चाकी वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांनी ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली.चालकाला  काच खाली घ्यायला लावत तुला गाडी नीट चालवता येत नाही का ? असे म्हटले त्यानंतर हुज्जत घालत साईभक्तांच्या वाहनाची काच फोडली आणि त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत या साईभक्तांना लुटले, यावेळी आरोपींनी हातातील बंदूक आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली आहे.मोहित पाटील व त्यांच्या मित्रांकडील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा १ लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी मोहित पाटील यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आठ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन भेट दिली असून  गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठलाअसून आता थेट साई भक्ताचेच वाहन अडून त्यांना बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून लूटमार झाली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदिप कोळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या घटनेतील संशयित आरोपींची सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार या संशयित तरूणांचा शोध घेण्याचे काम सूरु आहे.

Story img Loader