गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब या वादाच्या केंद्रस्थानी राहिलेलं दापोलीतलं साई रिसॉर्ट आज पाडलं जाणार आहे. अनिल परब यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वात आधी केला होता. पर्यावरण विभागानं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर न्यायालयात रीतसर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोन आठवड्यांपूर्वीच दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी ट्विटरवर दिली होती. त्यांच्यासोबतच रत्नागिरीतील अजून काही व्यक्तींवर हा गुन्हा दाखल झाल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. दापोली रिसॉर्टच्या जमीन खरेदी व्यवहारामध्ये आणि बांधकामातही अनियमितता झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणी अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.