Saif Ali Khan Attack Case Doctor On Health Update : अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने त्याला रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्याला खोल जखमा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानुसार, त्याच्यावर आज शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर माध्यमांना म्हणाले, “सैफ अली खानवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिकसर्जरी झाली आहे. त्यांना ऑपरेशन थिएटरमधून त्यांना आयसीयूत शिफ्ट केले आहे. एक दिवस त्यांचं निरिक्षण केलं जाईल. ते सध्या स्थिर आहेत. ते लवकरच रिकव्हर होतील. त्यांना २ खोल जखमा आहेत. दोन किरकोळ जखमा आहेत. अडीच इंचाचं चाकूचं टोक त्यांच्या मणक्यातून काढण्यात आला आहे.”

त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करणाऱ्या मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मध्यरात्री २ च्या सुमारास सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी होते. त्यांच्या मणक्यात चाकूचा भाग अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रिया करून चाकू काढण्यात आला आहे. लिकिंग स्पायनल फ्लुएडवरही उपचार करण्यात आले. डाव्या बाजूला आणि मानेवरील असलेल्या खोल जखमांवर प्लास्टिक सर्जरी टीमकडून उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती आता पूर्णता स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहेत.”

मज्जातंतूतज्ज्ञ डॉ. नितीन डांगे, सुघटनशल्य चिकित्सक डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी, डॉ. नीरज उत्तमनी यांनी सैफ अली खान यांच्यावर उपचार केले. सैफला सध्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attack case doctor give health update neurosurgery and plastic surgery sgk