वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ (गुरुकुंज) मोझरीच्‍या संचालक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी आमदार पुष्‍पा बोंडे यांची तर उपाध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. २९ मार्च २०२२ रोजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्‍या संचालक मंडळाची बैठक चंद्रपूर येथे संपन्‍न झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्‍यात आला.

वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला देण्‍यात यावे या मागणीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलेल्‍या संसदीय संघर्षाला यश प्राप्‍त झाल्‍यानंतर जेव्‍हा श्री गुरुकुंज आश्रम मोझरी येथे त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यावेळी त्‍यांना राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज ज्‍या गादीवर बसायचे त्या गादीवर सन्‍मानपुर्वक बसविण्‍यात आले. त्‍यानंतर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाशी सुधीर मुनगंटीवार यांचा निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध आले. गुरुदेव भक्‍तांच्‍या अनेक मागण्‍यांसाठी मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्‍या पदाधिका-यांनी आ. मुनगंटीवार यांना आजिवन विश्वस्त म्‍हणून नियुक्‍त केले. वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्‍न या सर्वोच्‍च उपाधीने मरणोत्‍तर सन्‍मानीत करण्‍यात यावे या गुरुदेव भक्‍तांच्‍या मागणीचा ते सातत्‍याने पाठपुरावा करीत आहे. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍यावरील मुनगंटीवार यांची श्रध्‍दा, गुरुदेव भक्‍तांसाठी असलेला जिव्‍हाळा यातुन मुनगंटीवार यांचे गुरुकुंज मोझरीशी दृढ नाते निर्माण झाले आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी माजी आमदार पुष्‍पा बोंडे आणि उपाध्‍यक्षपदी मुनगंटीवार यांची निवड झाल्‍याबद्दल संचालक मंडळाने दोघांचेही अभिनंदन केले. यापुढील काळातही अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्‍या माध्‍यमातुन वं. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या विचारांचा प्रसार व प्रचार करण्‍याचे कार्य आपण श्रध्‍दापुर्वक करु असे मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Story img Loader