सरकारने स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित केलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना कोतवाली पोलिसांनी रविवारी दुपारी शहरातील पुणे रस्त्यावरील सक्कर चौकात पकडला. या तांदळासह ९ लाख रुपये किमतीचा टेम्पो (एमएच १७ ए ७०४८) असा एकूण १० लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यासंदर्भात दीपक पन्नालाल गांधी व अमोल गोपीनाथ जाधव (दोघेही रा. नगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे यांनी ही कारवाई केली. टेम्पोत ५० किलो वजनाच्या २०० गोण्या होत्या.

Story img Loader