सोलापूर : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रपणे उत्साहाने आणि मंगलमय वातावरणात साजरी होत असतना सोलापुरात काही असामाजिक शक्ती सक्रिय होऊन शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. बकरी ईदनिमित्त ईदगाह मैदानावर समूहिक नमाज अदा झाल्यानंतर ईदगाहबाहेर बालबच्च्यांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या फुग्यांवर चक्क पाकिस्तानचे नाव आणि झेंडे असल्याचे आढळून आले. ‘लव्ह पाकिस्तान’ या मजकुरासह पाकिस्तानी ध्वज छापलेल्या फुग्यांची विक्री होत असताना मुस्लीम बांधवांनी वेळीच जागरूकता दाखविली आणि फुगे विकणाऱ्या संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजय पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) असे फुगे विकणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला ताब्यात घेऊन पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र हे पाकिस्तानचे नाव आणि झेंडे असलेले फुगे सोलापुरात आले कोठून ? हे फुगे कोणी पाठविले ? त्याचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा – मुलीचं भलं ते ७०,००० कोटींचा घोटाळा; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर, म्हणाले, “खरं आहे…”

सकाळी होटगी रस्त्यावर नवीन आलमगीर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी परंपरेनुसार हजारो मुस्लीम बांधव बालबच्च्यांसह आले होते. नमाज अदा झाल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत, गळाभेट घेऊन मुस्लीम बांधव ईदगाहबाहेर आले. त्यावेळी समोर बालबच्चे कंपनीसाठी आकर्षित करणारे फुगे व इतर खेळण्यांची विक्री केली जात होती. त्यावेळी वडीलधारी मंडळी लहान मुलांसाठी फुगे खरेदी करीत असताना ते फुगे हातात घेतल्यानंतर धक्काच बसला. कारण त्या फुग्यांवर चक्क ‘लव्ह पाकिस्तान’ असा आक्षेपार्ह मजकूर ठळकपणे छापलेला होता. त्याच फुग्यांवर दुसरीकडे पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजाचेही चित्र होते. हे पाहून मुस्लीम बांधव लगेचच सजग झाले. त्यांनी तात्काळ हालचाल करून संबंधित फुगे विक्रेत्याला ताब्यात घेऊन तेथील बंदोबस्तावरील पोलिसांच्या हवाली केले. पाकिस्तानी फुग्यांची विक्री होत असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले.

हेही वाचा – “भाजपा-राष्ट्रवादीच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवारांनी…” आणखी एका नेत्याचा गौप्यस्फोट

एकीकडे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्रपणे साजरी होत असताना गोवंशांची हत्या होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सक्रिय होऊन सार्वजनिक रस्त्यांवरील गोवंशाची तस्करी पकडत आहे. तत्पूर्वी, औरगजेबाचे आक्षेपार्ह स्टेटस समाजमाध्यमांवर ठेवण्याचे प्रकार घडल्यामुळे तर दुसरीकडे महापुरुष आणि धर्म संस्थापकांविषयी आवमानजनक मजकूर समाजमाध्यमांतून प्रसिद्ध करण्यावरून समाजात शांतता भंग करण्याचे प्रकार घडत असतानाच बकरी ईदच्या दिवशी चक्क पाकिस्तानी फुगे विकण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sale of love pakistan printed balloons in solapur ssb
Show comments