दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या ६९व्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी बाभळगाव येथे प्रार्थनासभा घेण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई देशमुख, अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, आमदार वैजनाथ िशदे आदी उपस्थित होते.
समाधिस्थळावर विलासरावांच्या चाहत्यांची अभिवादनासाठी गर्दी उसळली होती. डॉ. राम बोरगावकर व सहकाऱ्यांनी भजने सादर केली. भारावलेल्या वातावरणात विलासरावांच्या स्मृती जागवल्या गेल्या. अॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, महापौर  स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, उदगीरचे नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, रेणा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील, मांजरा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख, जागृती कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, उपायुक्त शिवाजी िशदे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे आदींनी अभिवादन केले.

Story img Loader