समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या पीएला फोनवरून ही धमकी मिळाली आहे. या धमकीच्या फोननंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “भाजपा पक्ष ओबीसी, बहुजनविरोधी,” चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर नाना पटोलेंचे टीकास्र

धमकीचा फोन कॉल आल्यानंतर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला या देशाच्या संविधाने कायद्याच्या चौकटीत राहून बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. मला १९९५ सालापासून संरक्षण पुरवण्यात आलेले आहे. मात्र आता सरकारने माझे संरक्षण कमी केले आहे. निवडणुकीसाठी ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशातून हे सगळे केले जात आहे,” अशी टीका अबू आझमी यांनी दिली.

हेही वाचा >> ‘पंतप्रधान आता काय करणार?’ संजय राऊतांचा नरेंद्र मोदींना सवाल; म्हणाले, ‘गंगेत प्रेतांप्रमाणे…!’

“शिवसेना, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्रुवीकरण केले जात आहे. भाजपा अगोदरच या मार्गावर आहे. हे सरकार हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडणं निर्माण करत आहे. मुस्लिमांचा चुकीचा इतिहास सांगून हिंदू लोकांच्या मनात चीड निर्माण केली जात असून या मार्गावरून ते सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही अबू आझमी म्हणाले.

हेही वाचा >> जोशीमठमधील लोकांची करायची होती मदत, एकट्याने केला ३०० किमी प्रवास, पण ऐनवेळी गाडी खोल दरीत कोसळली; पादरीचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, अबू आझमींना मिळालेल्या या धमकी प्रकरणावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांना पूर्ण ते संरक्षण दिले जाईल. मुंबई ही खूप सुरक्षित आहे. येथे महिला रात्रीदेखील फिरू शकतात. हेच मुंबईचे वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य जपले पाहिजे,” असे दीपक केसरकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samajwadi party mla abu azmi receives death threats from mobile phone prd