शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सायकलवरून पडल्याने आज (बुधवार) जखमी झाले. त्यांच्या खुब्याला दुखापत झाली असून उपचारासाठी भारती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे (वय ८३) बुधवारी सायंकाळी गणपती पेठेतून गणेश मंदिराकडे सायकल वरून निघाले होते. वळणावर अचानक ते सायकलवरून पडले. त्यांनातत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्यांना भारती रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader