प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर परिसरात तीन कबरी आढळल्या आहेत. यातील तिसरी कबर कोणाची याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी ही तिसरी कबर कोणाची याबाबत मोठा दावा केलाय. “ही तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केला होता,” असं संतोष शिंदे म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
सतोष शिंदे म्हणाले, “अफजल खानाच्या कबरीशेजारी आणखी दोन-तीन कबरी सापडल्या. याचा अर्थ त्या पहिली कबर अफजल खान, दुसरी सय्यद बंडा आणि तिसरी कदाचित कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याची असावी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पहिला वार करणारा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता.”
हेही वाचा : विश्लेषण : शिवाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास काय? ती इंग्लंडच्या राजाला कोणी आणि का दिली? वाचा…
“कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने हल्ला केल्यामुळे महाराजांनी एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले होते. कुलकर्णी जागेवर संपवला होता,” असंही संतोष शिंदे यांनी म्हटलं.