भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर रमेश बैंस याची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर स्वराज्य संघनटेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोश्यारी यांना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे, अशी टीकादेखील संभाजीराजे यांनी केली. दरम्यान नव्या राज्यपालांनी अगोदरच्या ज्या चुका केल्या आहेत, त्या लक्षात ठेवाव्यात, असा सल्ला त्यांनी नवनियुक्त राज्यपालांना दिला आहे. तसेच आगामी काळात महापुरूषांची बदनामी करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना ठोकून काढणार, असा इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. ते आज ( १२ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजुरीवर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

चुकणार त्यांना ठोकणार, राज्यपाल हे…

“स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आमची वेगळी ताकद निर्माण झालेली आहे. अशी परत वाच्यता झाली तर स्वराज्य मागेपुढे पाहणार नाही. जे चुकणार त्यांना ठोकणार. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, म्हणून काही बंधनं येतात. स्वराज्य ही एक सामाजिक संघटना आहे. मागील पाच ते सहा महिन्यांत माझे महाराष्ट्रभर दौरे झालेले आहेत. महाराष्ट्रातील लोकांच्या खूप अपेक्षा आहेत,” असे संभाजी छत्रपती म्हणाले.

हेही वाचा >>> कोश्यारींचा राजीनामा मंजूर होताच संभाजीराजेंचा नव्या राज्यपालांना मोलाचा सल्ला, म्हणाले “ज्या चुका…”

त्यांना हे उशिराने सुचलेले शहाणपण

“कोश्यारी यांनी हा निर्णय अगोदरच द्यायला हवा होता. त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वदग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांविषयीही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाची घडी मोडून काढली. पण त्यांना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. जे नवीन राज्यपाल आले आहेत, त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहे,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

हेही वाचा >>> भगतसिंह कोश्यारींना पदमूक्त केल्यानंतर अमोल मिटकरीचं ट्विट चर्चेत; म्हणाले, “इज्जत वाचविण्याचा प्रयत्न”

स्वराज्य संघटना लवकरच राजकारणात उतरणार

“स्वराज्य संघटनेने राजकारणात यावं, असं लोकांना वाटतं. २००७ सालापासून आम्ही आंदोलन करत आलो आहोत. आमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. हे कुठपर्यंत चालणार. सामान्य माणसाने राजकारणात यायला हवे. सामान्य माणसानेही आमदार, खासदार व्हायला हवे. सामान्यांना ताकद मिळायला हवी. स्वराज्य संघटना राजकारणात येणार आहे. २०२४ साली स्वराज्य संघटना निवडणूक लढवणार,” असे म्हणत त्यांनी स्वराज्य संघटना लवकरच राजकारणात उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji chhatrapati said will not tolerate insult of maharashtra great leaders insult prd
Show comments