भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे विरोधी पक्षांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाच कोश्यांरीच्या राजीनाम्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारींना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेच जुन्या राज्यपालांकडून ज्या चुका झालेल्या आहेत, त्या नव्या राज्यापालांनी लक्षात ठेवाव्यात, असा सल्लाही त्यांनी नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांना दिला आहे. ते आज (१२ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “…ते काम पूर्ण झालं असं भाजपाला वाटत असेल, म्हणून आता कोश्यारींना पदावरून हटवलं” नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

त्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाची घडी मोडून काढली

“कोश्यारी यांनी राजीनामा दिला असे आम्हाला समजले. त्यांनी हा निर्णय अगोदरच द्यायला हवा होता. त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांविषयीही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाची घडी मोडून काढली. पण त्यांना हे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. जे नवीन राज्यपाल आले आहेत, त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत,” असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

हेही वाचा >> “शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही”, जयंत पाटलांचे भाजपावर टीकास्र; म्हणाले, “त्यांना..”

माजी राज्यपालांकडून ज्या चुका झालेल्या आहेत, त्या…

“महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे. महाराष्ट्राने अनेक महापुरुष, नेते घडवलेले आहेत. या महापुरुषांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र चालतो. राज्यपाल हे घटनात्मक, सन्मानाचे पद आहे. संपूर्ण महाराष्ट्र या पदाकडे आदर्श म्हणून पाहात असतो. म्हणूनच माजी राज्यपालांकडून ज्या चुका झालेल्या आहेत, त्या नव्या राज्यपालांनी लक्षात ठेवाव्यात. महाराष्ट्राची परंपरा अन्य राज्यांत घेऊन जाण्याची राज्यपालांची जबाबदारी आहे. नव्या राज्यपालांनी या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने कराव्यात,” असा सल्ला संभाजीराजे यांनी रमेश बैस यांना दिला.

हेही वाचा >> “…याचं नव्या राज्यपालांनी भान ठेवावं,” संजय राऊतांचा रमेश बैस यांना सल्ला

आता नवे राज्यपाल आले आहेत, त्यांच्याकडून…

“त्यांना राजीनामा देण्याचे उशिराने सुचलेले शहाणपण आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीनेही राज्यपालांना जाऊदेत असे म्हणत होते. त्या काळात महाराष्ट्रात खूप गदारोळ झाला. कोश्यारी यांना कोणी पाठीशी घातले, कोणी पाठिंबा दिला हे सर्वांनाच माहिती आहे. आता नवे राज्यपाल आले आहेत, त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवुयात,” असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji chhatrapati warns new maharashtra governor ramesh bais after bhagat singh koshyari resignation prd
Show comments