६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत मराठा आरक्षणाविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावलं आहे. यावेळी येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य माराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं देखील संभाजीराजे म्हणाले. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.
“आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…”, रायगडावरून संभाजीराजे भोसले कडाडले!
रायगडावरून खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन निश्चित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-06-2021 at 10:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji raje bhosale on maratha reservation shivrajyabhishek on raigad pmw