Sambhaji Raje : महाराष्ट्राला एक वेगळा पर्याय निर्माण व्हावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. स्वच्छ आणि पारदर्शक मनाने आम्ही एकत्र आलो आहेत असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रात जी काही पक्षांची फाटाफूट झाली त्यावरही त्यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे. परिवर्तन महाशक्तीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje ) यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी खोचक शब्दात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

काय म्हणाले संभाजीराजे?

“महाराष्ट्रासाठी एक चांगला पर्याय निर्माण व्हावा या दृष्टीकोनातून आम्ही तुमच्या समोर येत आहोत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला शाहू, फुले आंबेडकरांचा विचार आम्ही देत आहोत. तसंच छत्रपती शिवराय हे आमचा आदर्श आहेत. परिवर्तन महाशक्ती त्याचसाठी निर्माण झाली आहे. आपणही सकारात्कामक विचार केला पाहिजे. आपण सत्तेत का येऊ शकत नाही? त्यांचाच ठेका आहे? आयुष्यभर नुसती चळवळ करायची, शेतकऱ्यांसाठी नुसतं राबायचं? आपण सत्तेत बसून प्रश्न सोडवू शकतो. बच्चू कडूंकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे.” असं संभाजीराजे ( Sambhaji Raje ) म्हणाले.

हे पण वाचा- तिसऱ्या आघाडीचा घाट केवळ अहंभावामुळे?

शिवसेना खुर्द आणि बुद्रूक आणि राष्ट्रवादी खुर्द आणि बुद्रूक कुठली?

महायुती कुठली? मला लोकांची सेवा करायची आहे ही भूमिका बच्चू कडूंनी घेतली. मला ही भूमिका आवडली. यानंतर संभाजी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर टीका केली. “दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी पक्ष यामुळे मी गोंधळून गेलो आहे. गावं नाही का दोन नावांची असतात तसे कोण आहेत? राष्ट्रवादी खुर्द कोण आहे ? राष्ट्रवादी बुद्रुक कोण आहे? शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? हे जे काही झालं ते काही जनतेच्या हितासाठी झाले का? तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला”, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली. खऱ्या अर्थाने आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे म्हणून मी, राजू शेट्टी, बच्चू कडू एकत्र आलो आहोत असंही यावेळी संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje ) म्हणाले.

मला सांगा तुम्ही किल्यांसाठी किती पैसे दिले?

“माझं चॅलेंज आहे की, तुम्ही किल्ल्यांसाठी किती पैसे दिले हे सांगा. ७५ वर्षात फक्त १ कोटी खर्च. फक्त शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधकही शांत झाले”, असं संभाजीराजे ( Sambhaji Raje ) म्हणाले.