औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस औरंगाबादेत मुक्कामी आहेत. शहरातील विविध चौकात फलकांवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करावे या मागणीचा जोर वाढावा अशी रचना मनसेच्या कार्यरत्यांनी केली. त्याच वेळी या प्रश्नावर शिवसेनेने मात्र मौन पाळले असल्याचे दिसून आले. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ‘ऑरिक सिटी हॉल’ची पाहणी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी गुरुवारी केली. तसेच महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेतला. या बठकीनंतर पत्रकारांनी त्यांना संभाजीनगरच्या मुद्दय़ावरुन छेडले असता ‘राजकारणावर मी नंतर बोलेन. सध्या काम करण्याकडे कल आहे’, असे सांगत प्रश्न टोलवला. नंतर अन्य एका बैठकीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ हा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे. याबाबत विचारले असता, ‘आता फक्त विकासावर बोलणार. निवडणुका आल्या की राजकीय बघू’ म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल दिली.
संभाजीनगरवर मौन; विकास कामावर बोलणार : आदित्य ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचे 'संभाजीनगर' हा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-02-2020 at 07:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajinagar aurngabad mns shivsena we will talk only development says aditya thackeray nck