राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची राजकीय कोंडी झाली आहे. या निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. दरम्यान या राजकीय घडामोडी घडत असताना छत्रपती घराणे कोणत्याही तणावाखाली नाही. जर आपणच तणावाखाली राहिलो तर जनतेची कामे कशी करू, असं युवराज कुमार शहाजीराजे यांनी म्हटलं आहे. गुरूवारी सोलापुरात एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी युवराज कुमार शहाजीराजे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील भाष्य केलं.
हेही वाचा >>> आर्थिक विवंचनेतुन एसटी वाहकाची गळफास घेऊन आत्महत्या ; पुसद आगारातील स्वछता गृहातील घटना
छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पुन्हा संधी मिळणार का, हा प्रश्न अनुत्तरीत असताना चाललेल्या राजकीय घडामोडींविषयी छत्रपतींचे पुत्र म्हणून काय वाटते, असे विचारले असता, “यासंदर्भात आम्ही कोणत्याही ताण-तणावात नाही. घरात कोणकोणते साहित्य खरेदी करायचे, यावर काल आपण आईशी बोलत होतो. छत्रपतींच्या कुटुंबीयांचे दैनंदिन जीवन नियमितपणे सुरू आहे. आमच्या दिनचर्येत कोणताही फरक पडला नाही,” असे युवराज कुमार शहाजीराजे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> “मोदींनी मसणात जा”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर दिपाली सय्यद भडकल्या!
तसेच पुढे बोलताना आसपास वावरणाऱ्या आणि छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मंडळींत अस्वस्थता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच “राजकारणात वावरताना जीवनात ताण तणाव असणे योग्य नाही. ते पटतही नाही. आम्हीच आनंदित नसू तर सामान्य जनतेची कामे करूच शकणार नाही,” असेही युवराज कुमार शहाजीराजे म्हणाले.
हेही वाचा >>> ईडी कारवाई करणार हे अगोदरच कसं कळतं? खुद्द किरीट सोमय्या यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…
दरम्यान, शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे एक फोटो अपलोड करत मी जनतेशी कटीबद्ध असेल असं सांगितलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेतलं स्वराज्य निर्माण करायचं असल्याचंही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलंय.