किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संभाजी ब्रिगेडने या घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, संभीजाराचे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त अन्य विधीस परवानगी नसावी अशी मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नेमकं काय घडलं आहे?
शनिवारी रायगड किल्ल्यावर शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे राज्यभरातील कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठया संख्येने हजर होते. राजसदरेवरील राज्याभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर तिथली परीस्थिती पाहून सारेच अवाक झाले.
त्या ठिकाणी काही लोक पिंडदानाचा विधी करत होते. पिठाचे गोळे, फुले व इतर साहित्य पाहून त्यांना हा पिंडदानाचा विधी असल्याची खात्री झाली. संभाजी ब्रिगेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सुर्यकांत भोसले व तेथे आलेल्या अन्य शिवभक्तांनी हा प्रकार पाहिला आणि तिथं पिंडदान करणाऱ्या व्यक्तींना याचा जाब विचारला. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.
संभीजीराजे छत्रपतींचं पत्र
“दुर्गराज रायगडवर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस्थळी जो प्रकार घडला व गेल्या काही महिन्यांत काही लोकांनी संशयास्पद विधी केल्याचे आढळून आले आहे, याला अटकाव घालण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात,” यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना पत्र लिहिल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. ट्विटरला त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.
पत्रात त्यांनी लिहिलं आहे की “समस्त देशाचे शक्तीस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर गेल्या काही महिन्यात श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर काही संशयासप्द विधी केल्याचे आढळून येत आहे. अशा प्रकारामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊन असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. याकरिता, संपूर्ण दुर्गराज रायडावर व विशेषत: राजसदर, शिवसमाधी परिसर, होळीचा माळ, बालेकिल्ला परिसर याठिकाणी श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे विधी करण्यास अटकाव करण्यात यावा. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग व केंद्रीय पुरातत्व विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व तात्काळ व्यवस्था अंमलात आणावी”.
संभाजी ब्रिगेडची कारवाईची मागणी
“शिवसमाधी आणि रायगड परिसरात पोलीस तैनात असतात. शिवाय पुरातत्व विभागाची देखरेख असते. पोलीस तैनात असूनही असा प्रकार घडतोच कसा? याचा अर्थ पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या संगनमताने असे प्रकार होतात असा घेता येईल. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याची शासनाने दखल घेतली पाहिजे. आणि संबंधित लोक तसेच पोलीस , पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.