मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा-शिंदे गटातील आमदारांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला घेरलं होतं. त्यात अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून टीकास्त्र सोडलं जात आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले होते, “आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Priya Sarvankar on Amit Thackeray
‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
keir starmer diwali party hindu angry
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीवरून हिंदूंमध्ये संताप; नेमके प्रकरण काय?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

हेही वाचा :

अजित पवारांच्या विधानानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या हिंदवी स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी बाईंसाहेब यांनी केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, हे निश्चित आहे. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं सुद्धा रक्षक केलं, हे कोणीही नाकारू शकत नाही,” असं संभाजीराजेंनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

“संभाजी महाराज हे स्वराज्याचे आणि धर्माचे रक्षक तसेच धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे विधान केलं, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कोणत्याही बाबत अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून, अर्धसत्य बोलले आहेत. स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मवीर नव्हते हे विधान साफ चुकीचं आहे,” असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : संभाजीराजेंचा ‘धर्मवीर’ उल्लेख केल्याने संतापलेल्या अजित पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “त्यांच्या विचारांच्या लोकांनी…”

“माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहिल की इतिहासाच्या बाबत, करण्यात येणारी विधान बरोबर नाही. इतिहासकारांनी केलेल्या विश्लेषणाचं आपण आत्मचिंतन करायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एवढा मोठा इतिहास आपल्याकडे आहे. तरीही तुम्ही विकृत काहीतरी बोलून वाद निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही,” असेही संभाजीराजेंनी म्हटलं.