SambhajiRaje Chhatrapati : अरबी समुद्रामध्ये २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पार पडले होते. मात्र, त्यानंतर अद्यापही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम झाले नसल्यामुळे आता स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आज ते स्मारकाची पाहणी करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी काही सवाल करत सरकारवर हल्लाबोल केला. “केंद्रात तुमचं सरकार, राज्यात देखील तुमचं सरकार, स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं. मग स्मारक का झालं नाही?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

“आम्ही कोणतेही आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेलो नाहीत. खऱ्या अर्थाने आपल्याला अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय हा राज्यातील १३ कोटी जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते आपले गडकोट किल्ले व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे माझा १५ ते २० वर्षांपासून प्रयत्न सुरु आहे. रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरण स्थापन झालं. त्यासाठी मी सरकारला भाग पाडलं. ७५ वर्षांत पहिल्यांदा रायगड किल्ल्याचं सवर्धन सुरु झालं”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : महायुतीला बिगर मराठा मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात…”
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
Devendra Fadnavis Constituency, Sachin Waghade,
फडणवीसांच्या मतदारसंघातील उमेदवार म्हणतो, “मी बेरोजगार, मला मत द्या…”
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

हेही वाचा : नवी मुंबई ते बंगळूरू दरम्यान विमान उतरण्याची सुविधा असलेला महामार्ग; नितीन गडकरी यांची घोषणा

“मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सर्व नेत्यांची इच्छा होती. २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला हवं. त्यानंतर २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने घोषणा केली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात करणार आहोत. पुढे २०१६ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी ज्यावेळी जलपूजन करण्यासाठी येतात, याचा अर्थ तुमच्याकडे सर्व परवानगी आहे. त्याशिवाय देशाचे पंतप्रधान जलपूजनासाठी येणार नाहीत. तेव्हा मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो. मलाही कौतुक वाटलं. मग ज्या प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं. मला तुलना करायची नाही. मात्र, २०१६ मध्ये स्मारकासाठी जलपूजन झालं आणि त्यासाठी एक समितीही स्थापन झाली. मात्र, त्यानंतर पुढे काय झालं?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशीही माझी चर्चा झाली. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझी चर्चा झाली. सर्वांना विचारलं की हे स्मारक का उभा राहीलं नाही? तर सर्वांचं उत्तर एकच आलं की पर्यावरणाच्या अडचणी निर्माण झाल्या आणि पुढे हा विषय न्यायालयात गेला. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही, असं सांगण्यात आलं. मग आता माझा या सरकारला प्रश्न आहे की, तुमचं केंद्रात सरकार, तुमचं राज्यात सरकार, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच स्मारकाचं जलपूजन केलं. मग स्मारक का झालं नाही?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.