प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीच्या आसपासची अतिक्रमणे हटवण्यात आली होती. त्यानंतर आता गडावर छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा ( शिवप्रताप स्मारक ) काढतानाचा पुतळा उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सरकारने अतिक्रमण काढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशालगड आणि लोहगडावरील सुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी सूचित केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा उभारण्याचा निर्णय ही कौतुकाची बाब आहे. पण, तिथे शिवाजी महाराज यांचं स्मारक उभं राहायला हवे,” अशी मागणी संभाजीराजे यांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा : मृतदेहाचे ३५ तुकडे केलेल्या Shradha Murder Case संदर्भात CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…”

“हे स्वराज्य उभे करताना शिवाजी महाराजांना किती अडचणी आल्या. अफजलखानला युद्धनीतीच्या माध्यमातून प्रतापगडला कसं आणलं. कौशल्याच्या माध्यमातून अफजलखानचा कोथळा काढला, या गोष्टी या स्मारकामध्ये दाखवायला हव्या. इतिहास आणि पार्श्वभूमी स्मारकात नमूद होणं गरजेचं आहे,” असेही संभाजीराजे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “डोळ्याला पाणी लाऊन म म म्हणणारे हिंदुत्व….”, सुषमा अंधारेंनी ठणकावून सांगितलं; फडणवीस, केसरकरांना ही केलं लक्ष

रायगड किल्ल्याचा पुनर्विकास सुरु आहे. यावर संभाजीराजे यांनी म्हटलं, “रायगडचं संवर्धन आणि जतन हे आव्हानात्मक काम आहे. पण, अडचणींतून मात करणे या मताचा आहे. सरकारच्या पैशांची अडचण नाही. पण, त्यासाठी सरकार आणि पुरातत्व खात्याच्या परवानग्या मिळवणे आव्हानात्मक आहे,” असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati on shivpratap memorial pratapgad satara ssa