मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे आहे. दरम्यान, जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. तसेच मनोज जरांगे यांना स्वतःच्या तब्येतीला जपण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजे म्हणाले, मनोज पुन्हा एकदा उपोषण करतोय हे ऐकून मी धावपळ करत इथे आलो आहे. त्याची धडपड मला दिसतेय. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हा संघर्ष करतोय. त्याने मला सांगितलं आहे, समाजाला न्याय मिळावा एवढीच त्याची इच्छा आहे. म्हणून तो उपोषणाला बसला आहे.

संभाजीराजे म्हणाले, मला कळत नाही, मी मनोजला उपोषण करण्यापासून कसं थांबवू. त्याने विचारलं दुसरा पर्याय काय, त्यावर मी म्हटलं माझ्याकडे याचं उत्तर नाही. मी मनोजला कसं सांगू, माझ्याकडे शब्दच नाहीत. एकीकडे त्याला सांगायचं की, मनोज हे बरोबर नाही, उपोषण नको करू. तो माझ्या शब्दापलिकडे जाणार नाही असं म्हणेल, परंतु, त्यानेही समाजाला एक शब्द दिला आहे. मनोज शब्दाचा पक्का आहे.

माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, मला एका गोष्टीची खूप भीती वाटतेय. त्यामुळे मी त्याला फक्त एवढंच म्हणेन की तब्येतीला जप. हे उपोषण तब्येतीसाठी खूप हानीकारक आहे. परंतु, तो मला म्हणेल, मला समाज दिसतो, माझा समाज माझ्या जीवनापेक्षा मोठा नाही. त्याने मला एकच सांगितलंय, तो पाणीसुद्धा पिणार नाही. त्यामुळे मला त्याची खूप काळजी वाटतेय.

हे ही वाचा >> गिरीश महाजनांचा फोन का उचलला नाही? मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना नुसतं…”

माजी खासदार म्हणाले, मी उपोषण केलं होतं तेव्हा चार दिवस पाणी प्यायलो नाही. चार दिवसांनी पाणी प्यायलो तरी मी हतबल होतो. खूप त्रास होत होता. त्यामुळे मला मनोजची चिंता आहे. मला त्याची काळजी वाटते. म्हणूनच मी धडपडत, धावत-पळत कोल्हापूरहून इथे आलो. मी त्याला भेटायला कालच (२४ ऑक्टोबर) येणार होतो. परंतु, काल दसरा असल्यामुळे येऊ शकलो नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati visits manoj jarange patil protest maratha reservation asc
Show comments