यंदाची लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते. त्याआधीच सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, युती आणि आघाडीतले पक्ष जागावाटपावर चर्चा करत असतानाच कोल्हापूरचे शाहू महाराज द्वितीय यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेला उभे राहणार आहेत. शाहू महाराजांचे पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संभाजीराजे म्हणाले, माझ्या वडिलांनी लोकसभेला उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना या निवडणुकीत जिंकवण्यासाठी आम्ही सर्वजण १००० टक्के योगदान देऊ. महाराजांचा अनुभव कोल्हापूरला वेगळी दिशा दाखवेल यात काही शंका नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी काही वेळापूर्वी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी लोकसभा निवडणूक लढवणार होतो. माझं तसं ठरलं होतं. मी कोल्हापूर किंवा नाशिक मतदारसंघाचा विचार करत होतो. परंतु, माझ्या वडिलांनी निवडणूक लढवायचं ठरवलं आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केल्यावर माझा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उरत नाही. माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यामुळे मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना तयारी करण्यास सांगितलं आहे. मी ही निवडणूक लढवली असती तर माझं शंभर टक्के योगदान दिलं असतं. आता महाराज लढणार आहेत म्हटल्यावर महाराजांसाठी आम्ही १००० टक्के योगदान देऊ.

maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
Radhakrishna Vikhe Patil Said This Thing About Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
odi’s call for consolidation was aimed at addressing the BJP’s growing challenge in Dhule City.
Narendra Modi : धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक है तो सेफ है’चा नारा का दिला? काय आहे कारण?
Kalwa-Mumbra Constituency,
कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना

संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत? ते मशाल (शिवसेनेचा ठाकरे गट) किंवा हाताचा पंजा (काँग्रेस) यापैकी कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत? कारण, या दोन पक्षांबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. यावर संभाजीराजे म्हणाले, शाहू महारांजांची भूमिका मी मांडू शकत नाही. त्यांची भूमिका तेच स्पष्ट करतील. तसेच कोल्हापूरच्या जनतेलाही महाराज हवे आहेत. महाराज प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, त्यांच्या उमेदवारीबाबत मविआ नेते काय निर्णय घेणार आणि महाराजांची भूमिका काय असेल ते आपल्याला लवकरच कळेल. मविआचे नेते आणि महाराज योग्य वेळी सर्व गोष्टी स्पष्ट करतील.

हे ही वाचा >> “मविआ नेत्यांमधील मतभेदांमुळे…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; जागावाटप न होण्यामागचं कारण स्पष्ट करत म्हणाले…

संभाजीराजे म्हणाले, शाहू महाराजांसाठी आम्ही संपूर्ण कोल्हापूर मतदारसंघ पिंजून काढू. कोल्हापूर हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. हाच विचार देशभर जावा अशी महाराजांची इच्छा आहे. आम्ही त्यासाठी सर्व प्रकारची मेहनत घेऊ.