Sameer Bhujbal vs Suhas Kande Nandgaon Assembly Constituency : नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसेच कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या रस्त्यावर शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या बाहेरच प्रसारमाध्यमं व पोलिसांसमोर कांदे व भुजबळ भिडल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेनंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच समीर भुजबळ यांनी ‘गुरुकुल’बाहेर काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.

समीर भुजबळ म्हणाले, “मी रस्त्याने जात होतो. तिथे मला काही बसेस, टेम्पो, ट्रक उभे असलेले दिसले. मी ते पाहण्यासाठी आत गेलो. तिथे स्थानिक आमदाराची शाळा आहे. तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं होतं. ते सगळं पाहून मी पोलिसांना फोन केला. निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार केली. मी त्यांना सांगितलं की तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं आहे. पैसे वाटण्याचे काम चालू होतं, लोकांना जेवण दिलं जातं होतं, खानावळी चालू होत्या, हे सगळं पोलिसांना कळायला हवं होतं. मात्र, त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही. तेवढ्यात आमदार महाशय तिथे आले आणि ते थेट माझ्या अंगावर धावून आले. मला जीवे मारण्याची धमकी देत होते, त्यांनी मला शिवीगाळही केली. पोलीस मात्र हे सगळं निमूटपणे बघत बसले होते. त्यांच्याबरोबर (आमदार) आलेले गुंड जे तडीपार आहेत ते मला मारायचा प्रयत्न करत होते. मी त्यांची नावं पोलिसांना दिली आहेत. परंतु, पोलिसांनी अद्याप त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

हे ही वाचा >> धुळ्यातील मुलींचं अहमदनगरमध्ये मतदान, विखेंच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची लोणी बुद्रूकमध्ये नोंद? VIDEO व्हायरल

काय म्हणाले समीर भुजबळ?

अपक्ष उमेदवार भुजबळ म्हणाले, “तडीपार गुंड मनमाडमध्ये, नाशिकमध्ये शस्त्र घेऊन फिरत आहेत. लोकांना धमक्या देत आहेत. आज ते पोलिसांसमोरच आले होते. मी पोलिसांना म्हटलं की यांना अटक करा. परंतु, त्यांनी अटक केली नाही. पोलिसांनी त्यांना इथून पळून जायला सांगितलं. पोलीसच गुन्हेगारांना पळवून लावत होते. आमदाराच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मला शिवीगाळ केली, मला मारायची धमकी दिली आणि पोलीस मात्र हे सगळं बघत बसले होते. माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. शिवीगाळ होत आहे. आज पत्रकारांसमोर मला शिवीगाळ केली. मला मारण्याची धमकी दिली. ‘आज तुझा मर्डर होणार’, ‘तुझा मर्डर फिक्स आहे’, असे शब्द आमदाराने वापरले. ‘मी तुझा मर्डर करणार’ असं बोलून ते मला धमक्या देत होते. पोलीस मात्र निमुटपणे बघत होते”.

Story img Loader