कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणी करायची किंवा नाही, याबाबतचा निर्णय येत्या ६ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी यासंदर्भात दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टी पाहता आरोपीची ब्रेन मॅपिंग चाचणी करणे गरजेचे असल्याचे सरकारी पक्षाने सांगितले. मात्र, हा प्रकार म्हणजे समीर गायकवाडच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. ब्रेन मॅपिंग चाचणी करून न्यायालयाने श्रम आणि वेळ वाया घालवू नये, असे बचावपक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय ६ ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते श्याम मानव यांनी काही दिवसांपूर्वी समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर श्याम मानव यांचे सर्व आरोप फेटाळताना संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा ‘सनातन’कडून करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा