प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. यातील एक आरोप वानखेडेंचा भाजपाशी संबंध असल्याचाही होता. याच आरोपाविषयी पत्रकारांनी समीर वानखेडे यांना विचारलं. यावर वानखेडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीममध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपाशी संबंध असल्याच्या आरोपाबाबत विचारलं असता समीर वानखेडे म्हणाले, “मी कायदा पाळणारा माणूस आहे आणि केवळ संविधानाचं पालन करतो.”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
ap dhillon diljit dosanjh dispute
दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”
Prakash Ambedkar
“RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

“कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का?”

यावेळी समीर वानखेडे यांना त्यांच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? आणि वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर वानखेडे म्हणाले, “याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी भारताचा एक सेवक आहे आणि सर्वप्रकारे सेवा करत राहीन.”

“आरोप करणारे मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता?”

या पत्रकार परिषदेत समीर वानखेडेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी आणि त्यांच्या अटकेवरही प्रश्न केला. “तुमच्यावर आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आहेत आणि तुम्ही बाहेर आहात याकडे कसं बघता?”, असा प्रश्न समीर वानखेडेंना विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, “त्या व्यक्तीविषयी मला काहीही भाष्य करायचं नाही. त्यांनी माझ्यावर खालच्या स्तरावरील आरोप केले होते. त्यामुळे मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही.”

“पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का?”

पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “मला भारतात कुठेही पाठवलं तरी मी काम करेन. मी एक शिस्तबद्ध सैनिक आहे.”

हेही वाचा : “… आम्ही आता सगळे काही संपवून टाकू” म्हणत, समीर वानखेडेंना ट्विटरवरून धमकी

आर्यन खानला न्यायालयाने क्लीन चिट दिली त्यावर काय सांगाल, क्लीन चिट मिळाली म्हणजे तपासात कमी पडले का? असेही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर वानखेडे म्हणाले, “ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी एनसीबीत कार्यरत देखील नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणं योग्य नाही.”

Story img Loader