सांगली : “राजकारणसुद्धा एक प्रकाराची देशसेवाच आहे, मात्र मी राजकारणात प्रवेश करेन की नाही, हे आताच सांगता येणार नाही,” असे मत महसूल सेवेतील सनदी अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सांगलीमध्ये युवा शिवप्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वानखेडे म्हणाले, मला देशाची सेवा करायची आहे, मग ती कोणत्याही स्वरुपात असली तरी चालेल, राजकारण हीसुद्धा एक प्रकारे देशसेवाच आहे. मात्र, मी राजकारणात येईन की नाही, हे आताच सांगता येणार नाही. मुंबईतील कारवाईदरम्यान, राजकीय क्षेत्रातून आरोप झालेत. या संकट काळामध्ये मी केवळ छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, बाजीप्रभू देशपांडे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच स्मरण करीत राहिलो. यामुळे भीती वाटली नाही. मी फक्त संविधान आणि कायदे मानतो, मधला काळ हा माझ्या सेवेमधील संघर्षाचा काळ होता, असे ते म्हणाले.
हेही वाचा – सांगली : मिरजेत शुक्रवारपासून दोन दिवसीय कामगार साहित्य संमेलन
हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीवरून आता देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना आणखी एक आव्हान, म्हणाले…
यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना वानखेडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी तरुणांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होण्याबरोबरच जिद्द निर्माण व्हावी यासाठी वानखेडे यांचे मार्गदर्शन आयोजित केले असल्याचे सांगितले.