मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्याविरोधातील अॅट्रोसिटी प्रकरणात वाशीम न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती दिली. तसेच खूप खालच्या पातळीवर आरोप झाल्याने वानखेडे कुटुंबाला खूप त्रास झाल्याचं वानखेडेंनी म्हटलं. ते गुरुवारी (२५ ऑगस्ट) वाशीममध्ये आले असताना माध्यमांशी बोलत होते.
समीर वानखेडे म्हणाले, “१४ ऑगस्टला मुंबईत जात पडताळणी समितीने निकाल दिला. या निकालानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात एस. सी. एस. टी. कायद्यानुसार अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय भारतीय दंड विधानानुसार मानहानीची कलमं देखील लावली होती. माझे बंधु संजय वानखेडे यांनीही वाशिममध्ये तक्रार नोंदवली होती.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा : आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आणि तुम्ही बाहेर याकडे कसं बघता? समीर वानखेडे म्हणाले, “त्यांनी माझ्यावर…”
“खालच्या पातळीवर आरोप झाल्याने वानखेडे कुटुंबाला खूप त्रास झाला”
“त्याअनुषंगाने आज (२५ ऑगस्ट) मी वाशीम जिल्ह्यात न्यायालयासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. आमचा न्यायालयावर खूप विश्वास आहे. आम्हाला नक्की न्याय मिळेल. खूप खालच्या पातळीवर आरोप झाल्याने वानखेडे कुटुंबाला खूप त्रास झाला होता. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे,” असं वानखेडेंनी नमूद केलं.