समृद्धी महामार्गावर दुर्घटनेचे सत्र सुरुच आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर इथे मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगार ठाऱ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तीन जण यामध्ये जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

NDRF च्या दोन टीम घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी मंत्री दादा भूसे यांनी घटनास्थळी पोहचत आढावा घेतला असून दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे. तसंच मृत कामगारांच्या कुटुबियांना मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरात सुरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजतं आहे. शहापूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. सुरक्षेची कोणताही उपाय योजना नसल्यामुळे मजुरांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजुरांवर कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अंधार असल्याने गर्डर आणि मशीनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांची निश्चित संख्या किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार घेण्यासाठी पुण्याला येणार आहेत. त्याआधीच काही तास ही घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्घटनास्थळी येणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.