50 Vehicles Punctured On Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटर लांबीचा असणार समृद्धी महामार्ग सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आता समृद्धी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २९ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव ते वनोजा टोल नाका या दरम्यान एक दोन नव्हे तब्बल ५० वाहने पंक्चर झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर पडलेल्या लोखंडी पत्र्यावरुन वाहने गेल्याने हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

प्रवाशी रात्रभर अडकले

ही घटना २९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून, यामुळे ५० हून अधिक वाहने अचानक पंक्चर झाली. याचा चारचाकी वाहनांसह आणि मालवाहू वाहनांनाही फटका बसला. तसेच समृद्धी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या घटनेनंतर अनेक प्रवाशी त्यांच्या वाहनाचे पंक्चर काढता न आल्याने ते रात्रभर समृद्धी महामार्गावर अडकले होते.

Google Maps
Google Maps misguides trailer : गुगल मॅप्सने दिला धोका! बाजारातील अरूंद रस्त्यावर घुसला १० चाकी ट्रेलर, ७ तास वाहतूक ठप्प
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
shilphata road traffic update first day traffic jam dombivli kalyan
Shilphata Traffic : शिळफाटा मार्गावरील पहिला दिवस कसा होता? वाहतूक कोंडी झाली का?
Why hassle of Shaktipeeth Highway when there is viable alternative
सक्षम पर्याय असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी?
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा
Traffic jam due to concreting on Aarey Road Mumbai news
आरे मार्गावर काँक्रीटीकरणानंतरही पुन्हा खोदकाम; अनेक ठिकाणी खड्डे खणल्यामुळे वाहतूक कोंडी
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू

हे ही वाचा : “वाल्मिक कराड शरण आला, आधी पुण्यात….”; सीआयडी अधिकारी सारंग आव्हाड यांनी काय सांगितलं?

रस्ते महामंडळाकडून खुलासा

या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने स्पष्टीकरण दिले असून, एका मालवाहू वाहनातून लोखंडी पत्रा पडला होता. त्यावरून वाहने गेल्याने ती पंक्चर झाल्याचे, त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर या घटनेचा जा प्रवाशांना फटका बसला त्यांना त्यांची वाहने दुरुस्त करण्यात मदत केल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, “गुंडांचे राज्य…”

समृद्धी महामार्गावर अपघातामुळे २३३ प्रवाशांचा मृत्यू

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटर लांबीचा असलेला समृद्धी महामार्ग अंदाजे ५५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या महामार्गामुळे दहा जिल्ह्यांमधील ३९० गावे जोडली गेली आहेत. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाला याच महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नागपूर ते शिर्डी या ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या कालावधी महामार्गावरून एक कोटी ५२ लाख वाहने धावली असून यातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) ११०२ कोटी रुपये महसूल मिळाला. मात्र त्याचवेळी १४० अपघातांमध्ये २३३ प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे.

Story img Loader