प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी येथे घंटागाडी कामगारांच्या वतीने ‘संविधान गौरव फेरी’ काढण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी सात वाजता फेरीला सुरुवात होईल. एम.जी. रोड, रविवार कारंजा, पंचवटी, अशोकस्तंभ, आनंदवली, गंगापूर, गोवर्धन, सातपूर, अंबड, पाथर्डी, विहीतगाव, देवळाली गाव, जेलरोड, द्वारका, जिल्हा परिषदमार्गे महापुरुषांना अभिवादन करत राजीव गांधी भवन येथे एक वाजता फेरीचा समारोप होईल. फेरीच्या समारोपास महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांना संविधानाच्या सरनाम्याचे छायाचित्र भेट देण्यात येणार आहे.
आणखी वाचा