Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

राष्ट्रवादीत २०२३ ला फूट पडली. परंतु, अनुशक्ती नगरमध्ये २०२२ लाच फूट पडली होती, असं सना मलिक म्हणाल्या.

sana malik
सना मलिक काय म्हणाल्या? (फोटो – सना मलिक/X)

Sana Malik on Nawab Malik : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मलिक यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) २२ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. त्यामुळे अनुशक्तीनगर मतदारसंघात त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची लेक सना मलिक या कार्यरत राहिल्या. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच, त्यांच्या पक्षातील लोकांनीच त्यांना त्रास दिल्याचंही त्यांनी सांगितलं. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

“२०१७ ला मुंबई पालिकेच्या निवडणुकीत अपयश आलं. त्यानंतर अनुशक्ती नगरमध्ये मी जास्त कार्यरत झाले. विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत आहे, पण २०१७ ज्याप्रमाणे नवीन होते, तशी आता नवीन नाही”, असं सना मलिक म्हणाल्या.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “महाराष्ट्रात जे घडलं त्याला सर्वस्वी धनंजय चंद्रचूड जबाबदार, त्यांनी..”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
How many Votes gets MNS in Assembly Election
Assembly Election Political Party Vote Share: शून्य जागा मिळालेल्या मनसेला किती मते मिळाली? प्रत्येक पक्षाच्या मतदानाची आकडेवारी जाणून घ्या
Bangladesh Army violence against Hindu
Video: बांगलादेशी सैन्याचे हिंदूंवर अत्याचार; चितगावमध्ये ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
Mahayuti vs maha vikas aghadi
Maharashtra Assembly Election partywise strike rate: विधानसभेत कोणत्या पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ सरस; लोकसभेला सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला पक्ष यावेळी तळाला
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

“आमच्या कठीण काळात अजित पवारांनी आम्हाला साथ दिली. तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. या क्षेत्रातील प्रत्येक समस्येवर मला अजित पवारांनी मदत केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पूर्ण ताकदीने आम्हाला साथ दिली. दादांनी जो शब्द दिला तो पूर्ण केलाय”, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : “मी ऑन कॅमेरा सांगतेय की…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पक्षातील लोकांनी त्रास दिला

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. लोक म्हणतात की जून २०२२ ला सरकार पडलं. पण आमच्यासाठी फेब्रुवारीतच सरकार कोसळलं होतं. राष्ट्रवादी पक्षात २०२३ मध्ये फुटली. पण अनुशक्ती नगरमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्येच हे सर्व झालं होतं. आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की नवाब मलिक जसं काम करत आहेत, तसंच मी करावं. त्यानुसार मी काम सुरू केलं. तेव्हा आमचे विरोधकच नाही तर आमच्या पक्षातील लोकांनीही मला खूप त्रास दिला. प्रत्येक गोष्टीत अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. अशा काही गोष्टी केल्या ज्या करायला नव्हत्या पाहिजे. मी वुमेन कार्ड प्ले करत नाही”, अशी तक्रारही त्यांनी बोलून दाखवली.

“माझे वडील फक्त कामाच्या आधारवर मते मागतात. लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर तुमच्याविरोधात कोण आहे याचा फरक पडत नाही. निवडणुकीत जनताच राजा असते. त्यामुळे राजाने तुम्हाला साथ दिली की तुमच्याविरोधात कोण उभं आहे याचा फरक पडत नाही”, असंही सना मलिक म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sana malik on ncp split anushaktinagar maharashtra assembly 2024 sgk

First published on: 13-11-2024 at 10:40 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या