राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाने ही निवडणूक केंद्रीय तपास संस्थांच्या जोरावर जिंकली असा आरोप केला आहे. तसेच आमच्या हातात दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणीसदेखील आम्हाला मत करतील असं भाष्य राऊत यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर मनसेने जोरदार टीका केली आहे. ईडी चालवायला पण अक्कल लागते ‘ढ’टीमचे हे काम नाही, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> संभाजीराजेंच्या समर्थनार्थ शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत छत्रपती म्हणाले ‘माझ्या तत्त्वात…’

“अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद असून काही करू शकले नाही, 48 तास ईडी घेऊन काय करणार? ईडी चालवायलाही अक्कल लागते. ‘ढ’टीमचे हे काम नाही,” अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

हेही वाचा >>> ‘संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला,’ किरीट सोमय्यांचा आरोप; निवडणूक आयोगाने दखल घेण्याची केली मागणी

संजय राऊत काय म्हणाले?

“आमच्या हातामध्ये दोन दिवस ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसदेखील आम्हाला मतदान करतील. एकाचा विजय तर एकाचा पराभव झाला. पराभव झाला म्हणजे महाप्रलय आला, अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही. अनेक राज्यांमध्ये असे निकाल आलेले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. हरियाणामध्ये भाजपा आणि निवडणूक आयोगाने रडीचा डाव खेळू अजय माकन यांचा पराभव केला आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> ‘…तर शरद पवार यांच्या नावाला आमचा पाठिंबा,’ राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे भाष्य

तसेच, “महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला हाताशी धरून रात्रीच्या अंधारात नेते काय करत होते, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. तिकडच्या गृहखात्याला कसे फोन गेले. गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कशे फोन जात होते. कोणाचे मत कसे बाद करायचे याची चर्चा कशी सुरु होती? यंत्रणा आमच्याकडेही आहेत. फक्त ईडी नाही. आमच्याकडे ४८ तास ईडी दिली तर भाजपादेखील आम्हाला मतदान करेन,” असंदेखील संजय राऊत म्हणाले.

Story img Loader