आज (सोमवार) सकाळपासून कोल्हापूर, सांगली आणि साता-यात पेटलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सांगली वसगडे येथे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतक-याचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत नलावडे असे त्याचे नाव असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ऊस दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून या आंदोलनात १२ हून अधिक गाड्यांची तोडफोड झाली आहे. तसेच कोल्हापूरात आंदोलकांतर्फे पोलिसांची व्हॅनची जाळण्यात आली.
याआधी आंदोलकांनी सांगलीतील नांद्रे येथील वारणा, तासगाव आणि वसंतदादा साखर कारखान्यांचे विभागीय कार्यालय पेटवून दिलं आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेवलेली साखर रस्त्यावर फेकली. तसंच इस्लामपूर परिसरातील पुणे – बंगळूरू महामार्गही रोखून धरला. त्यामुळे सांगली-कोल्हापूर, सांगली इस्लामपूर आदी रस्ते बंद करण्यात आले आहेत.
उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपयांची देण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर संतप्त शेतकरू संघटनांनी आज (सोमवार) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा उशारा दिला होता. उसाला पहिली उचल तीन हजार लरूपये मिळावी व गतहंगामातील उसाला ५०० रूपयांचा हफ्ता मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा