Sangeeta Thombre Stone Peting on BJP Leaders Car : बीड जिल्ह्यातील केज विधानसभा (राखीव) मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अज्ञातांकडून दगडफेक झाली. या घटनेत संगीता ठोंबरे या किरकोळ तर त्यांच्या वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर केजमधील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे माजी आमदार संगीता ठोंबरे या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला एक कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली. यात चालक जखमी झाला असून संगीता ठोंबरे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

हे ही वाचा >> Amol Mitkari : “सर्व ठरवून केलंय का?” कोसळलेल्या पुतळ्याबाबत अमोल मिटकरींचा प्रश्न; नेमका आरोप काय?

हल्ला कोणी केला? पोलीस माहिती देत म्हणाले…

बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की “दगडफेक करणारा हल्लेखोर कोण होता त्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे”. केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की “माजी आमदार संगीता ठोंबरे या वडमाऊली दहिफळ येथून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम करून येत असताना गावापासून अर्ध्या किमी अंतरावर ही दगडफेकीची घटना घडली. संगीता ठोंबरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर त्यांच्या वाहनाचा चालक जखमी झाला आहे. मद्यपान केलेल्या एका इसमाने ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे”.

हे ही वाचा >> Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”

संगीता ठोंबरे पुन्हा सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रीय

माजी आमदार संगीता ठोंबरे यांना २०१९ मध्ये भाजपने उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्या ऐवजी ऐन वेळी पक्षात आलेल्या नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने थांबण्यास सांगितल्यामुळे आपण पाच वर्षे थांबलो. आता आपण सक्रिय झालेलो आहोत, असे अंबाजोगाई येथे पत्रकार परिषदेत सांगत माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांचा सहभाग वाढवला आहे. अलीकडेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाकडून तिकीट मिळावं यासाठी संगीता ठोंबरे प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangeeta thombre stone pelting on former bjp mla kaij beed asc